अकोला: पार्थ पवार प्रकरणावर काँग्रेसच्या वतीने पार्थ पवार वर गुन्हा दाखल करून अजित पवारांनी राजीनामा द्यावा आंदोलनातून मागणी
Akola, Akola | Nov 10, 2025 कोरेगाव पार्क प्रकरणात आता राज्यभरात मोठ्या प्रमाणात गाजत आहे दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यावर जमीन घोटाळ्याचा आरोप लावण्यात आला आहे. दरम्यान नऊ जणांवर गुन्हे दाखल झाले आहे मात्र एका जनावर गुन्हा दाखल झाला नाही त्यामुळे इतरांवरही गुन्हे दाखल करण्यात यावे आणि उपमुख्यमंत्री पद आणि पालकमंत्र्यांचा अजित पवारांनी राजीनामा द्यावा या मागणीला घेऊन काँग्रेसच्या कडून अकोल्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणा देऊन निषेध आंदोलन करण्यात आलं.