अकोट: अग्रसेन भवन जवळील पाईपलाईन मध्ये लिकेज;पाणी गळतीने आरोग्य धोक्यात
Akot, Akola | Nov 12, 2025 शहरातील अग्रसेन भवन जवळील पाईपलाईन मध्ये लिकेज असल्याने या ठिकाणी लिकेज पाईपलाईन मधून पाणी गळती होत आहे. ह्या पाणी गळतीतून दूषित पाण्याचा निचरा होण्याची भीती व्यक्त करण्यात येत असून पाणी गळतीमुळे नागरिकांचे आरोग्य देखील धोक्यात असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. अग्रसेन भवन जवळील लिकेज पाईपलाईन ची दुरुस्ती करणे नागरिकांच्या आरोग्यासाठी आवश्यक झाली असून पाणी गळतीमुळे परिसरातील रस्त्यांवरून पाणी वाहत आहे.