रामटेक उपविभागातील आदिवासी बहुल देवलापार, पारशिवनी भागातील जंगलाच्या सीमावर्ती परिसरात वन्य हिंस्र प्राण्यांच्या निरंतर हल्ल्यात मानव व पशुंचा नाहक बळी जात आहे. याकडे लक्ष वेधत खासदार श्यामकुमार बर्वे यांनी शुक्रवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारीला मुख्य वनसंरक्षकासह संबंधित वरिष्ठ वन अधिकारी यांची बैठक वनामती नागपूर येथे आयोजित करून उपाययोजनांवर विस्तृत चर्चा केली.