समाज कल्याण विभागाच्या गटई स्टॉल योजनेच्या निकषात सुधारणा.. आज दिनांक 28 शनिवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना, अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील बांधवांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी राज्य शासनाने गटई स्टॉल योजनेच्या व्याप्तीमध्ये मोठे बदल केले असून निकषांमध्ये सुधारणा केली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने 28 जानेवारी 2026 रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार आता ही योजना अधिक व्यापक आणि सुटसुटीत करण्यात आली आहे. पूर्वी ही योजना संत रोहिदास चर्मोद्यो