पुणे शहर: पौडरोडवर ‘ड्रोन’चा थरार! राजमाता जिजाऊ नगर परिसरात रहिवाशांत खळबळ.
Pune City, Pune | Oct 22, 2025 पौडरोडवरील राजमाता जिजाऊ नगर परिसरात गेल्या एका तासापासून एक ड्रोन आकाशात घिरट्या घालत असल्याचे पाहून नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. रात्रीच्या शांत वातावरणात अचानक वर आकाशात झपाट्याने फिरणाऱ्या या ड्रोनकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काही रहिवाशांनी याबाबत पोलिसांना माहिती दिल्याचे समजते.