अकोला: गांधी रोडवर शेतकऱ्यांचे तीव्र सरकारविरोधी आंदोलन, काळी दिवाळी साजरी
Akola, Akola | Oct 21, 2025 क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने सोयाबीन, मुग आणि उडीद यांची रस्त्यावर विक्री करून शेतकऱ्यांनी काळी दिवाळी साजरी केली. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, सरकारने जरी हमीभाव जाहीर केला असला तरी खरेदी केली जात नाही. व्यापारी खरेदी करत असतात, पण हमीभाव दिला जात नाही. तसेच, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, कर्जमाफी आणि पिक विमा वेळेवर मिळत नाही. या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर गवळी, तालुका अध्यक्ष मंगेश गावंडे आणि सुनील इंगळे यांच्यासह शेतकऱ्यांची उपस्थिती हो