चंद्रपूर: जिल्ह्यातील बल्लारपूर येथील शेत शिवारात शेतकऱ्यांची काळी दिवाळी — भाकर, पिठलं, ठेचा खाऊन निषेध
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार आज दि.21 ऑक्टोबर ला 12 वाजता बल्लारपूर शहर व तालुक्यात शेतकऱ्यांनी "काळी दिवाळी" साजरी करत अनोखा निषेध नोंदवला. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अद्यापही मदत रक्कम न आल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आपल्या बांधावर भाकर, पिठलं आणि ठेचा खाऊन सरकारविरोधात नाराजी व्यक्त केली.