अलिबाग: आरक्षण बचावसाठी कुणबी समाज एकवटला
अलिबागेत तहसील कार्यालयावर मोर्चा आंदोलनाला इतर ओबीसी घटकांचा पाठिंबा
Alibag, Raigad | Sep 15, 2025 मराठा समाजाला ओबीसी जातीचे प्रमाणपत्र देण्यासंदर्भात राज्य सरकारने निर्णय घेतल्यानंतर कोकणातील कुणबी समाज आक्रमक झालाय. या निर्णयाला कुणबी समाजासह इतर ओबीसी समाजाकडून तीव्र विरोध होत आहे. सरकारच्या निर्णयाविरोधात जिल्हयातील कुणबी समाज एकवटून रस्त्यावर उतरला. सोमवारीअलिबाग तहसील कार्यालयासमोर कुणबी समाजासह ओबीसी बांधवांनी निदर्शने केलीआणि तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. मराठा आरक्षणाचा जीआर रद्द करा, मराठयांना ओबीसी दाखले देवू नये, शिंदे समिती बरखास्त करा अशा मागण्या केल्या