भोकरदन: कुंभारी फाटा येथून अंगारिका चतुर्थी निमित्त राजुरच्या दिशेने हजारो भाविक पायी रवाना
आज दिनांक चार मे 2016 वार सोमवार रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील तसेच शहरातील हजारो भाविक भक्त कुंभारी फाटा येथून अंगारिका चतुर्थी निमित्त उद्या होणाऱ्या राजुर येथे श्री गणरायाचे दर्शन घेण्यासाठी रवाना झाले आहे, यावेळी या भाविकांना ठीक ठिकाणी फराळाचे आयोजन सुद्धा भोकरदन वाशी यांच्यावतीने करण्यात आले होते, याप्रसंगी भोकरदन शहरासह परिसरातील वातावरण अगदी भक्तिमय झाल्याचे पाहायला मिळाले आहे.