वणी: ब्राह्मणी फाट्याजवळील शिव मंदिरालगत आढळला अज्ञात इसमाचा कुजलेला मृतदेह
Wani, Yavatmal | Sep 29, 2025 वणी घुग्गुस महामार्गावरील ब्राह्मणी फाट्याजवळ असलेल्या शिव मंदिरामागे एका अज्ञात इसमाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना सोमवार २९ सप्टेंबरला दुपारच्या सुमारास उघडकीस आली. मृत इसमाची अद्याप ओळख पटलेली नाही.