राजकुमार पाल वय 28 वर्ष हे त्यांचे काका राम-खिलावन खलगोनिया वय ४४ वर्षे राहणार डिप्टी सिग्नल यांच्यासोबत दुचाकी वर मागे बसून त्यांच्या कामावर कन्हान रेल्वे स्टेशन येथे जात असताना कन्हान नदीच्या पुलावर एका खाजगी ॲम्बुलन्स ने दुचाकीला समोरून धडक दिली यात काका पुतण्या दोघेही गंभीर जखमी झाले. दोघांनाही उपचारासाठी कामठी येथील रुग्णालयात नेले असता तेथे उपचारादरम्यान काकांचा मृत्यू झाला तर यातील पुतण्याचा उपचार धंतोली येथील खाजगी रुग्णालयात सुरु आहे.