काशिनाथ चौकातील महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड या वित्तीय संस्थेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यानेच पदाचा दुरुपयोग करत, एजंटच्या मदतीने एका मृत व्यक्तीच्या नावे बनावट कागदपत्रे तयार करून तब्बल ८ लाख ६० हजार रुपयांचे कर्ज मंजूर करून संस्थेची आर्थिक फसवणूक केल्याची खळबळजनक घटना १ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली आहे. याप्रकरणी दुपारी ४ वाजता एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.