कामात कसूर करणाऱ्यांना आमदार अमोल खताळ यांनी अधिकाऱ्यांना झापले कामातील त्रुटी आणि नागरिकांकडून आलेल्या तक्रारींची गंभीर दखल घेत आमदार अमोल खताळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. विविध विकासकामांतील हलगर्जीपणा, रखडलेली कामे आणि नागरिकांच्या तक्रारींबाबत थेट जाब विचारत त्यांनी अधिकाऱ्यांची खरडपट्टी केली.