भंडारा: 'नमो युवा मॅरेथॉन' स्पर्धेच्या आयोजनानिमित्त शहरातील विश्रामगृहात भारतीय जनता युवा मोर्चाची बैठक संपन्न
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून म्हणजेच १७ सप्टेंबर आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दरम्यान २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत सेवा पंधरवाडा निमित्त भारतीय जनता पार्टीने देशभरात 'सेवा पंधरवडा' कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाचाच एक भाग म्हणून, भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो) भंडारा जिल्ह्याकडून 'नमो युवा मॅरेथॉन' स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या मॅरेथॉन स्पर्धेच्या नियोजनासाठी १४ सप्टेंबर रोजी दुपारी ४.३० वाजता दरम्यान भंडारा शहरातील विश्रामगृहात...