ठाणे: नौपाडा येथील गावदेवी मैदानात कबुतरांना खायला घातल्याप्रकरणी मनसे आक्रमक
Thane, Thane | Sep 26, 2025 नौपाडा येथील गावदेवी मैदानात कबुतरांना खायला घातल्याप्रकरणी मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसेचे नौपाडा शाखा अध्यक्ष विनायक नलावडे यांनी आक्रमक भूमिका घेत कबुतरांना खायला घालणाऱ्यांना आज दिनांक २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास जाब विचारला आहे. दरम्यान, कबुतरांना खायला घालायला उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. तसेच कबुतरांमुळे मानवी आरोग्यास धोक्याचे असल्याचे देखील न्यायालयाने अधोरेखित केलं होतं.