महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार चंद्रपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षणाची सोडत आज दि ११ नोव्हेंबरला १२ वाजता प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहात पार पडली. या सोडतीत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग तसेच सर्वसाधारण प्रवर्गांतील आरक्षण निश्चित करण्यात आले असून, महिलांसाठी एकूण ३३ जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत.