जालना: जालना शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी उपमहापौर राजेश राऊत मैदानात
Jalna, Jalna | May 24, 2026 जालना शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी जालना महानगरपालिकेचे उपमहापौर राजेश राऊत यांनी पुढाकार घेत स्वतः मैदानात उतरून स्वच्छता मोहिमेची पाहणी केली. आज बस स्थानक परिसरात महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून विशेष साफसफाई मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान उपमहापौर राजेश राऊत स्वतः उपस्थित राहून स्वच्छतेच्या कामावर लक्ष ठेवत कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना देताना दिसून आले. शहरातील नागरिकांकडून स्वच्छतेबाबत कोणत्याही तक्रारी येऊ नयेत, तसेच बस स्थानक परिसर स्वच्छ व सुस्थितीत राहावा यासाठी त्