गंगापूर: कोळघर शिवारात तलावातील पाण्यात बुडून परप्रांतीय मजुराचा मृत्यू
परप्रांतीय मजूर तरुणाचा गाव तलावाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना तालुक्यातील कोळघर शिवारात शनिवारी सायंकाळी उघडकीस आली. बद्रीप्रसाद हरिसिंह डवरिया (वय ३७, रा. बडगाव, सेंधवा, बडवानी, मध्य प्रदेश) असे मयताचे नाव आहे.कोळघर येथील रवी काळे यांच्याकडे कुटुंबासह मजुरी करणारे बद्रीप्रसाद शुक्रवारी सकाळी गाव तलावाच्या परिसरात शौचासाठी गेले होते. ते बराच वेळ न परतल्याने कुटुंबासह काळे यांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला; मात्र, ते मिळून आले नाहीत. शनिवारी स