जालना: महाराजस्व अभियानातून 13 हजारांहून अधिक सेवा; महसूल विभागाचा उपक्रम ठरला यशस्वी
Jalna, Jalna | Apr 2, 2026 जालना जिल्ह्यात महसूल विभागाच्या पुढाकारातून राबविण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीरांतर्गत नागरिकांना मोठ्या प्रमाणावर सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. गुरुवार दि. 2 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या अभियानातून आतापर्यंत जिल्ह्यातील नागरिकांना एकूण 13 हजार 695 महसूलविषयक सेवा प्रदान करण्यात आल्या असून, जागेवरच कामे पूर्ण झाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले.शासनाच्या मार्गदर्शनाखाली शिबिर सुरू आहे.