जळगाव तालुक्यातील सिलबर्डी शिवारात बकऱ्या चारणाऱ्या महिलेचा एकांताचा फायदा घेवून पंप उचलण्याचे बहाणाने आवाज देवून अश्लिल चाळे करून तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी ५ डिसेंबर रोजी दुपारी २ रोजी घडली आहे. याप्रकरणी शनिवारी ६ डिसेंबर रोजी रात्री १० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.