नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा.पाटील यांचे नाव देण्यात यावे या मागणीसाठी 22 डिसेंबर रोजी आंदोलन करण्यात येणार होते. मात्र महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू आहे, कायद्याचे पालन करत आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी तात्पुरते आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.मात्र यापुढे होणारे आंदोलन मंत्रालयात समोर करण्यात येणार असल्याची माहिती खासदार सुरेश म्हात्रे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे.