बुलढाणा: जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या प्रारूप आरक्षणाबाबत हरकती व सुचनांसाठी १७ ॲाक्टोबर पर्यंत मुदत
बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती सभापती व सदस्य पदांच्या आरक्षणाची सोडत सोमवारी काढण्यात आली असून या प्रारुप आरक्षणाबाबतची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या प्रारूप आरक्षणाची अधिसूचना जिल्ह्यातील क्षेत्रातील सर्व रहिवाशांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात आली असून या प्रारूप आरक्षण अधिसूचनेबाबत जनतेच्या काही हरकती असल्यास, जिल्हाधिकारी यांचेकडे १७ आक्टोबर पर्यंत सादर कराव्या.