भोकरदन: वाढोना गावामध्ये जलजीवन योजनेच्या कामाची पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करत चौकशी
आज दिनांक 17 एप्रिल 2026 वार शुक्रवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील वाढोना येथे पंचायत समिती भोकरदन च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जलजीवन योजनेच्या कामाची पाहणी करत चौकशी केली आहे या गावात सन 2024 व 2025 मध्ये मध्ये राज्य सरकारच्या वतीने गावकऱ्यांसाठी जलजीवन योजना राबविण्यात आली या योजनेत भ्रष्टाचार झाल्या असल्याच्या तक्रारी काही दिवसापूर्वी झाल्या होत्या या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर ही चौकशी करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.