नगर: नगर-पुणे रस्त्यावर दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद
नगर-पुणे रस्त्यावर चास शिवारात दरोड्याच्या तयारीत असलेली कुख्यात गुंड त्याचे इतर चार साथीदार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केली आहे. त्यांच्याकडून तब्बल ७ लाख ९० हजार ६०० रुपायंचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. गौरव हरिभाऊ घायाळ ( वय-२४, रा. सुपा), सतीश बाळासाहेब पावडे (वय-३५, मुळ रा. दरोडी, ता. पारनेर), अनिकेत रमेश साळवे (वय- २९, रा.ओम एन्टरप्रायजेसच्या पाठीमागे, सुपा), विशाल सुरेश जाधव यांना अटक केली आहे