समुद्रपूर: गिरडजवळ मालवाहू टाटा एसच्या धडकेत २ दुचाकीस्वार गंभीर, तर १ किरकोळ जखमी
समुद्रपूर तालुक्यातील हिंगणघाट उमरेड मार्गावरील गिरड गावाजवळ मालवाहू व दुचाकी मध्ये झालेल्या धडकेत २ दुचाकीवर गंभीर तर १ किरकोळ जखमी झाले असून गंभीर जखमी दोघांना उपचारासाठी समुद्रपुर ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. प्राप्त माहितीनुसार टाटा एसने क्रमांक एच ४० बि एल ०६८८ हा उमरेड कडून गिरड कडे कपाट घेऊन येत होता. तर दुचाकी क्रमांक एम एच ३२ वाय ९०५४ ला रीतेश झाडापे,अमन मेश्राम भगवानपुर,सुजल धानोरकर साखरा हे तिघे गिरड कडून सिर्सीकडे जात होते याच दरम्यान अपघात झाला.