चंद्रपूर: जिल्ह्यातील विविध भागातील तरुणांचा शहर जिल्हा काँग्रेस कार्यालयात युवक काँग्रेसमध्ये प्रवेश
राज्यातील वाढती बेरोजगारी, महागाई आणि सरकारच्या फसव्या आश्वासनांना कंटाळून युवक आता काँग्रेसच्या भूमिकेवर विश्वास दाखवत आहेत. आज दि 1 नोव्हेंबर ला 12 वाजता चंद्रपूर जिल्ह्यातील विविध भागातील तरुणांनी चंद्रपूर जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेसचे अध्यक्ष शंतनु धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली युवक काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हा प्रवेश सोहळा शहर जिल्हा काँग्रेस कार्यालयात पार पडला.