देवरी: धवलखेडी येथील अंगणवाडीतील खाऊच्या पॅकेटमध्ये मेलेला उंदीर पालकांमध्ये भीतीचे वातावरण
Deori, Gondia | Oct 18, 2025 देवरी तालुक्यातील धवलखेडी येथील अंगणवाडी केंद्रातून लहान बालकांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारातील पाकिटात मृत उंदीर आढळल्याची घटना दिनांक 17 ऑक्टोबर रोजी उघडकीस आली या घटनेने परिसरातील बालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरली आहे या अंगणवाडीतून सहा महिने ते तीन वर्ष वयापर्यंतच्या लहान मुलांना प्रोटीन्सची पाकिटे पुरवली जातात घरी गेल्यानंतर लाभार्थ्यांनी पाकीट उघडून बघितल्यावर ही बाब आल्याने मोठा प्रसंग ठरला मात्र या घटनेने बालकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे