समुद्रपूर: घराला आग आगीत जीवनोपयोगी साहित्य जळून खाक:समुद्रपूर शहरातील वार्ड क्रमांक ११ येथील घटना
समुद्रपूर शहरातील वार्ड क्रमांक ११ येथील घरी आग लागली या आगीत जीवनोपयोगी साहित्य जळून मोठे नुकसान झाले.आग लवकर लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला. प्राप्त माहितीनुसार शहरातील वार्ड क्रमांक ११ येथील रहिवासी बेबीबाई वसंतराव किन्नाके यांनी घरातील देवाऱ्यात देवपुजा करून दिवाबत्ती लावली आणि बचत गटाच्या कामाकरिता घरा बाहेर गेल्या असता काही वेळातच त्यांच्या राहत्या घराला आग लागली व एकच खळबळ उडाली घराशेजारी राहणाऱ्या चौधरी कुटूंबाना आग लागल्याचे लक्षात येताच त्यांनी विझवण्याचा प्रयत्न केला.