जालना: मेरीट हॉटेल ते रेल्वे स्टेशन दरम्यान एमडी ड्रग्ससह आरोपी जेरबंद; कदीम जालना पोलिसांची मोठी कारवाई
Jalna, Jalna | Jun 8, 2026 कदीम जालना पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत एमडी (मेफेड्रोन) या प्रतिबंधित अमली पदार्थासह एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. सोमवार दि. 8 जून 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या कारवाईत सुमारे 4 लाख 50 हजार 150 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 8 जून रोजी पहाटेच्या सुमारास मेरीट हॉटेल ते रेल्वे स्टेशन परिसरात एक व्यक्ती एमडी पावडर विक्रीसाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती.