जिल्ह्यात मागील अनेक वर्षांपासून प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा व्यवसाय जोमात सुरु आहे मात्र हे सर्व प्रशासनाच्या समोर होत असताना सुद्धा यावर कारवाई करण्याचं साधं धाडस प्रशासन तर्फे दाखविल्या जात नाही. चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारपूर व चंद्रपूर शहर मधून मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखूची वाहतूक केल्या जाते. या सर्व अवैध व्यवसायाची चौकशी व्हावी याकरिता उच्चस्तरीय समिती नेमावी यासाठी सामाजिक समता संघर्ष समितीतर्फे जिल्हाधिकारी गौडा यांना आज दि 3 नोव्हेंबर ला सायंकाळी 5 वाजता निवेदन देण्यात आले.