नागपूर ग्रामीण: हुडकेश्वर हद्दीत तरुणीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला १० वर्षांची सक्तमजुरी
नोकरीचे आमिष दाखवून २८ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार आणि अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या रोशन तुळसीराम मेश्राम (वय ४२) या नराधमाला न्यायालयाने १० वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.मार्च २०२४ मध्ये आरोपीने तरुणीला 'एम्स' हॉस्पिटलमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तिला सुनसान भागात नेऊन अत्याचार केले.