आगामी वर्धा नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, मतदारांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी दिनांक 29 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजताच्या सुमारास वर्धा शहरातून भव्य मतदार जनजागृती बाईक रॅली आयोजित करण्यात आली. 'स्वीप' कार्यक्रमांतर्गत आयोजित या रॅलीला शहरातील नागरिक, शिक्षक आणि नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. झेंडी दाखवून रॅलीचा शुभारंभ करण्यात आला.