उत्तर सोलापूर: मोबाईलचोर राजकुमार स्वामी तडीपार; सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून 2 वर्षांची हद्दपारी...
मोबाईल चोरीचे अनेक गुन्हे दाखल असलेल्या राजकुमार आनंदय्या स्वामी (वय वर्षें 27, रा. सेटलमेंट फ्री कॉलनी नं. 3, सोलापूर) या गुन्हेगारास सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून तब्बल 2 वर्षांकरिता तडीपार करण्यात आले आहे. राजकुमार स्वामीविरुद्ध सन 2025 मध्ये मोबाईल चोरीचे अनेक गुन्हे दाखल असल्याने सदर बाजार पोलीस ठाण्याकडून तडीपारीचा प्रस्ताव पोलीस उपआयुक्त (परिमंडळ) यांच्याकडे सादर करण्यात आला होता. सदर प्रस्तावानुसार पोलीस उपआयुक्त विजय कबाडे यांनी आदेश जारी केला.