शिरोळ: साखर कारखान्यांनी नफ्यातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वाटा द्यावा आंदोलन अंकुश संघटनेची मोटरसायकल रॅलीद्वारे मागणी
गत तीन हंगामांपासून साखर व प्राथमिक उपपदार्थांना बाजारात चांगला दर मिळत असल्याने साखर कारखान्यांना मोठा नफा मिळालेला आहे.मात्र दुसरीकडे सततचे महापुर व बदलत्या निसर्गामुळे ऊस उत्पादनात घट झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.उत्पादन खर्च दुपटीने वाढूनही शेतकऱ्यांना केवळ एफआरपी दरावर समाधान मानावे लागत आहे.या पार्श्वभूमीवर शिरोळ तालुक्यातील साखर कारखान्यांनी आपल्या नफ्यातून शेतकऱ्यांना वाटा द्यावा,अशी मागणी आंदोलन अंकुश संघटनेच्या वतीने आज सोमवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी दुपारी केली.