जळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी शुक्रवारी २ जानेवारी रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा दिवस होता. प्रभाग क्रमांक १३ क मधील उमेदवार वैशाली अमित पाटील यांची भाजपाच्या वतीने बिनविरोध निवड करण्यात आली आहे. वैशाली पाटील यांच्या विरोधात एकूण ११ उमेदवार विरोधात होते. दरम्यान यातील सर्वांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर वैशाली पाटील यांची निवड बिनविरोध करण्यात आली.