अकोट: बाजार समितीत सोयाबीनची आवक वाढली;दर पोहचले कमाल 5 हजार रुपये प्रति क्विंटलवर
Akot, Akola | Nov 11, 2025 कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची आवक वाढली आहे.मंगळवारी सोयाबीनचा कमाल दर 5 हजार रुपये प्रति क्विंटल वर पोहोचल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दर आणखी वाढण्याच्या आशा पल्लवीत झाल्यात मंगळवार रोजी अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीत 1560 क्विंटल सोयाबीनची आवक झाली किमान 3805 रुपयेचा दर तर कमाल 5 हजार पाच रु प्रति क्विंटलचा दर मिळाल्याने बाजार समितीत सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची सोयाबीन विक्रीसाठी लगबग दिसून आली तर नजीकच्या काळात सोयाबीनचे आवक आणखी वाढण्याची शक्यता आहे.