दादावाडी परिसरातील एटीएममध्ये बोलण्यात गुंतवून ठेवत एटीएम कार्डची अदलाबदल करीत सहाय्यक पशुधन विकास अधिकारी अनिता गणेश पाटील (वय ४६, रा. दादावाडी) यांच्या बँक खात्यातून ५० हजार रुपये परस्पर काढून घेतले. ही घटना शुक्रवारी १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास गुजराल पेट्रोलपंपाजवळ घडली. याप्रकरणी शनीवारी १५ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.