तहसील पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांनी 5 डिसेंबरला सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार, तहसील पोलिसांनी धडाकेबाज कार्यवाही करत पोलीस असल्याची बतावणी करत नागरिकांना लुटणाऱ्या इराणी टोळीच्या सदस्याला अटक केली आहे. आरोपीच्या इतर साथीदाराचा शोध घेणे सुरू आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांनी दिली आहे.