नागपूर ग्रामीण: नागपूर ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई: ४० लाखांचा मुद्देमाल जप्त, रेतीची अवैध वाहतूक रोखली
,नागपूर जिल्हा ग्रामीण पोलिसांच्या उपविभागीय पथकाने परिसरात अवैध रेती वाहतुकीवर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ४० लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.आरोपीकडून एक ट्रक आणि ९ ब्रास रेती असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.याप्रकरणी आरोपी निखिल सुरेश निपाणे आणि सुमित महेश मेश्राम दोघेही राहणार मोहाडी, जिल्हा भंडारा यांना अटक करण्यात आली.