"ना भीती लाटांची, ना तमा अथांग सागराची; ही जिद्द आहे उरणच्या छाव्याची!" या उक्तीला सार्थ ठरवत उरणच्या अवघ्या ६ वर्षीय मानस पाटील याने अरबी समुद्राच्या अथांग लाटांवर स्वार होऊन एक नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. मानसने पिरवाडी ते जेएनपीटी हे तब्बल १७ किलोमीटरचे आव्हानात्मक अंतर पोहून पार करत सर्वांनाच थक्क केले. या अद्भुत कामगिरीबद्दल आमदार महेश बालदी यांच्या हस्ते उरण येथील जनसंपर्क कार्यालयात मानसचा सत्कार करण्यात आला.