कळमनूरी: आखाडा बाळापूर परिसरात विजेच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस,बहुर शिवारात वीज पडून दोन बैल दगावली
कळमनुरी तालुक्यात आज दि.15 ऑक्टोबर रोजी दुपारी तीन ते चार वाजता च्या सुमारास आखाडा बाळापूर,बोल्डा, बहुर सह अन्य गाव शिवारात वादळी वारे विजेच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस होऊन सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याची फजिती झाली.तसेच बहुर शिवारात वीज पडून एका शेतकऱ्याचे झाडा खाली बांधून ठेवलेले बैल दगावल्याची माहिती प्राप्त झाली आहे त्यामुळे सदर शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे .