माजलगाव: माजलगाव मतदार संघातील कापूस पिकाचा बागायतीमध्ये समावेश करा आमदार सोळंके यांची मागणी
बीड जिल्ह्यातील माजलगाव मतदार संघात कापुस पिकाचा बागायती पिकांमध्ये समावेश करून त्यानुसार नुकसान भरपाई अदा करावी अशी मागणी माजलगाव चे आमदार प्रकाश सोळुंके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांनी भेट घेतली आहे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अभुतपुर्व अतिवृष्टी व महापुर परिस्थितीमुळे शेती आणि पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांच्या हातोंडाशी आलेला घास हिरावुन गेला आहे.