अकोला: शेतकऱ्यांनी तत्काळ ॲग्रीस्टॅक नोंदणी करून घ्यावी — महसूल प्रशासनाचे आवाहन
Akola, Akola | Nov 10, 2025 अकोला : अद्याप ॲग्रीस्टॅक नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांनी ती तात्काळ करून घ्यावी, असे आवाहन उपजिल्हाधिकारी निखील खेमनार यांनी केले आहे. शासन निर्णयानुसार ॲग्रीस्टॅक नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीची रक्कम थेट जमा केली जात आहे. तसेच त्यांना ई-केवायसी करण्याची गरज नाही. शेतकऱ्यांनी नमूना ७/१२ उतारा व आधारपत्रासह आपल्या सरकार सेवा केंद्रात जाऊन नोंदणी करून शेतकरी ओळख क्रमांक मिळवावा, असे जिल्हा प्रशासनाने दिनांक 10 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वा