परभणी रेल्वे स्थानक प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वर रविवारी दुपारी दोनच्या सुमारास एका अनोळची इसमाचा मृतदेह आढळून आला. मयताचे अंदाजे वय 65 ते 70 असून पोलीस राम कातकडे अंमलदार यांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह जिल्हा रुग्णालयात शिवविच्छेदनासाठी नेण्यात आला. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद नांदेड जी आर पी ठाणे येथे झाली असून तपास राम कातकडे करत आहेत.