रत्नागिरी : जिल्हा परिषद रत्नागिरी येथे जिल्हास्तरीय कुष्ठरुग्ण शोध मोहीम प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न..
449 views | Ratnagiri, Maharashtra | Nov 12, 2025 रत्नागिरी : जिल्ह्यात दि.१७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत "कुष्ठरुग्ण शोध मोहीम" राबविण्यात येणार असून,या अनुषंगाने दि.11/11/2025 रोजी रत्नागिरी येथे मा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अनिरुद्ध आठल्ये यांचे अध्यक्षतेखाली कुष्ठरुग्ण शोध मोहीम(LCDC) जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली.वैद्यकीय अधिकारी (कुष्ठरोग) डॉ परवेज पटेल यांनी कार्यशाळेस मार्गदर्शन केले.सदर कार्यशाळेस अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ महेंद्र गावडे,वैद्यकीय अधिकारी डॉ देविदास चरके,डॉ शरण काठोळे, सर्व तालुका आरोग्य अधिकारी,सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.सदर मोहीम प्रभाविपणे राबविण्याच्या सूचना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अनिरुद्ध आठल्ये यांनी दिल्या.