अकोला: हिंगणी येथे उत्कृष्ट कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा सन्मान सोहळा संपन्न.
Akola, Akola | Nov 12, 2025 अकोला जिल्ह्यातील हिंगणी येथे अजित कंपनीतर्फे शेतकऱ्यांचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात अकोला, अमरावती आणि वाशिम जिल्ह्यातील उत्कृष्ट कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. शेतकऱ्यांच्या मनोबलात भर घालण्यासाठी आणि त्यांच्या परिश्रमाला योग्य दाद देण्यासाठी हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष पिक पाहणी दौऱ्याचाही समावेश करण्यात आला होता.