धामणगाव रेल्वे: चिंचोली येथे नदी पात्रात आढळला युवकाचा मृतदेह
धामणगांव रेल्वे तालुक्यातील चिंचोली येथील विवाहित युवक अरविंद चरनदास इंगो लेवय 35वर्ष धंदा -हातमजुरी याचा नदी पात्रात पाण्यात बुडून मृत्यू झाला.अरविंद गेल्या 3-4दिवसापासून बेपत्ता होता. घरच्यांनी नातेवाईक व इतरत्र शोध घेतला असता तो कुठेही आढळून आला नाही. आज सकाळी गावातील काही लोक नदी काठी शौचाला गेले असता त्यांना नदीपात्रात एक पुरुष व्यक्तीचा मृतदेह उलटा दिसला असता त्यांनी माहिती लगेच परिसरातील पत्रकार प्रशांत नाईक यांना दिली असता लगेच पोलीस स्टेशन मंगरूळ दस्त माहिती देण्यात आली.