वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या सोशल मीडिया ट्रोलर्सना अटक करण्याच्या मागणीसाठी अकोल्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलय..वंचित बहुजन आघाडी चे नेते प्रकाश आंबेडकर आणि सुजात आंबेडकर यांच्याबाबत काही सोशल मीडिया वर ट्रोलर्स यांच्याकडून ट्रोल करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे या ट्रोलर्स वर गुन्हे दाखल करून घेण्यात आले मात्र आज पर्यंत पोलीस प्रशासनाने काहीच कारवाई केली नसल्याचा आरोप करीत ट्रोलर्सला अटक करण्याची मागणी केली आहे.