वडवणी: मयत डॉ.संपदा मुंडे कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी माझी आहे खा.बजरंग सोनवणे यांनी केले कुटुंबीयांचे सांत्वन
Wadwani, Beed | Oct 29, 2025 बीड : डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी आता राजकीय स्तरावरूनही तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई व्हावी, ही मागणी सर्वच स्तरांतून होत असताना खासदार बजरंग सोनवणे यांनी माध्यमांसमोर आपली ठाम भूमिका मांडली आहे. सोनवणे म्हणाले, "मयत संपदा मुंडे यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देणे ही माझी जबाबदारी आहे. मी एखाद्या प्रकरणात आलो तर त्याचा शेवट करतो, म्हणूनच आता या प्रकरणातही शेवटच करणार आहे," असे त्यांनी ठामपणे सांगितले.