नाशिक: धोत्रे खून प्रकरणातील फरार आरोपी अटकेत
गुंडा विरोधी पथकाची मध्यप्रदेशमध्ये धडाकेबाज कारवाई
Nashik, Nashik | Nov 7, 2025 नाशिक | धोत्रे खून प्रकरणातील फरार आरोपी सचिन फुलचंद दहिया (वय २४, रा. सतना, मध्यप्रदेश) यास गुंडा विरोधी पथकाने मध्यप्रदेशमधील गिंजारा गावातून ताब्यात घेतले आहे. २२ ऑगस्ट रोजी नांदुर नाका परिसरात किरकोळ वादातून राहुल धोत्रे याची मारहाण करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी मुख्य आरोपी उध्दव निमसे व साथिदारांवर गुन्हा दाखल झाला होता. घटनेनंतर आरोपी सचिन दहिया फरार झाला होता. पोलीस आयुक्त संदीप कर्णीक यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे अधिकारी ज्ञानेश्वर मोहिते होते.